निफाड : नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया अखेर मंगळवारी पार पडली. निफाड नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. संदीप अहेर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.मंगळवारी (दि. १९) दुपारी १२ वाजता निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापतिपदासाठी नगरसेवक चारुशीला कर्डिले यांच्या एकमेव अर्जावर सूचक म्हणून अलका पवार, तर अनुमोदक म्हणून लक्ष्मी पवार यांची नावे होती. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदासाठी नगरसेवक आनंद बिवालकर यांच्या एकमेव अर्जावर सूचक म्हणून मुकुंद होळकर व अनुमोदक म्हणून स्वाती गाजरे नाव होते. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतिपदासाठी नगरसेवक नयना निकाळे यांच्या एकमेव अर्जावर सूचक म्हणून जावेद शेख व अनुमोदक म्हणून नूरजहा पठाण यांची नावे होती. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी नगरसेवक मंगल वाघ यांच्या एकमेव उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून लक्ष्मी पवार, तर अनुमोदक म्हणून अलका पवार यांचे नाव होते.या चारही विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने चारुशीला कर्डिले (आरोग्य व शिक्षण), आनंद बिवालकर (पाणीपुरवठा व जलनिस्सारण), नयना निकाळे (सार्वजनिक बांधकाम समिती) व मंगल वाघ (महिला व बालकल्याण) या चौघांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप अहेर यांनी जाहीर केले. (वार्ताहर)
निफाड नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड
By admin | Updated: January 20, 2016 22:46 IST