लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या सातपूर प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाच्या पारड्यात सातपूरचे सभापतिपद पडले. आता शनिवारी (दि. २०) होणाऱ्या पश्चिम प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीतही मनसेच्या भूमिकेमुळे समीकरण बदलले असून, भाजपा व विरोधकांचे बलाबल समसमान होणार असल्याने चिठ्ठी पद्धतीने सभापतीची निवड होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे चिठ्ठी भाजपाला पावली तर सहापैकी पाच प्रभाग समित्या भाजपाच्या ताब्यात राहणार आहेत. दि. २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिक पश्चिम, दुपारी १२.३० वाजता पंचवटी आणि दुपारी ४ वाजता नाशिक पूर्व प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
चिठ्ठी पद्धतीने ठरणार सभापती
By admin | Updated: May 20, 2017 02:13 IST