बागलाण पतसंस्थेच्या सभापतिपदी तांबोळीं

By Admin | Updated: July 30, 2016 21:33 IST2016-07-30T21:31:20+5:302016-07-30T21:33:21+5:30

बागलाण पतसंस्थेच्या सभापतिपदी तांबोळीं

The Chairman of the Banking Credit Society | बागलाण पतसंस्थेच्या सभापतिपदी तांबोळीं

बागलाण पतसंस्थेच्या सभापतिपदी तांबोळीं

 सटाणा : येथील बागलाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभापतिपदी जावेद दाउद तांबोळी यांची, तर उपसभापतिपदी आसिफ शेखलाल मन्सुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निशाद शेख व अल्फिजा सय्यद यांनी अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पदाच्या निवडीसाठी पतसंस्थेच्या सभागृहात संचालकांची विशेष सभा बोलावली होती. निर्धारित वेळेत या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे सभापतिपदी जावेद दाऊद तांबोळी व उपसभापतिपदी असिफ शेखलाल यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात
आले.
निवडी नंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे संस्थापक फईम शेख व फजल शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फारुख सय्यद, निहाल शेख, अय्याज बागवान, हाजी आरिफ, सादिक मन्सुरी, राजू मन्सुरी, अनिस पापामिया ,वैशाली नाखरे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: The Chairman of the Banking Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.