अपहारप्रकरणी चेअरमनला अटक
By Admin | Updated: August 12, 2016 22:14 IST2016-08-12T22:13:25+5:302016-08-12T22:14:59+5:30
पिंपळगाव मोर : अंबड येथून ताब्यात

अपहारप्रकरणी चेअरमनला अटक
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संपत संतू काळे यांनी पदाचा दुरूपयोग करीत चक्क दोन मयत खातेदारांच्या नावे कर्ज काढून अपहार केल्याचे विशेष लेखापरीक्षणात सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा
गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात
दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संशयितास तब्बल महिनाभरानंतर घोटी पोलिसांनी शुक्रवारी (दि. १२) अटक
केली.
सदर संशयित फरार होता तर अटकपूर्व जामिनासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. घोटी पोलिसांनी गुरुवारी नाशिक येथे अंबड परिसरातून नातेवाईकाच्या घरी शिताफीने अटक केली.
डावरे यांच्या फिर्यादीवरून संशयित संपत काळे व सचिव धनराज सूर्यवंशी यांच्याविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत आज घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शेळके, कमलेश बच्छाव आदिनी संशयित संपत संतू काळे यांना अटक केली आहे. (वार्ताहर)