शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

सिनेस्टाइल पाठलाग करून जीपच्या सीटखालून जप्त केला ८७ किलो गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 22:03 IST

पोलिसांनी जीपचा पाठलाग सुरू केला. उपनगर, आंबेडकरनगरमार्गे चालकाने जीप डावीकडे वळवून डीजीपीनगर-१, वडाळागावातून थेट पाथर्डीफाट्यापर्यंत नेली तेथे पोलिसांच्या दोन्ही वाहनांनी जीपला घेरले.

ठळक मुद्देगांजाची आंतरराज्यीय तस्करीचे रॅकेट बॉर्डरसिलिंग पॉइंटला सतर्कतेच्या सूचना

नाशिक : सिन्नरफाटा येथे संशयित वाहनांची तपासणी गुन्हे शाखा युनिट-२चे पथक करत असताना सिन्नरकडून शहरात येणाऱ्या एका राखाडी रंगाच्या बोलेरो जीपवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्या जीपचा पाठलाग सुरू करत पाथर्डीफाटा येथे जीप रोखली. जीपच्या सीटखाली विशेष तयार केलेल्या पत्र्याच्या एका खोक्यातून पोलिसांनी तब्बल ८६ किलो ८७८ ग्रॅम इतका सुमारे ८ लाख ६८ हजार ७८० रुपयांचा गांजा जप्त केला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सिन्नरफाटा येथे गुन्हे शाखा युनिट-२चे पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन तपासणी मोहीम राबवित होते. यावेळी सहायक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक विजय लोंढे, युवराज पाटील आदींनी जीपचालकास थांबण्याचा इशारा केला असता त्याकडे त्याने दुर्लक्ष करत त्याने बोलेरो जीप (एम.एच १७ बीएस ४७४७) थेट द्वारकेच्या दिशेने दामटविली. पोलिसांनी जीपचा पाठलाग सुरू केला. उपनगर, आंबेडकरनगरमार्गे चालकाने जीप डावीकडे वळवून डीजीपीनगर-१, वडाळागावातून थेट पाथर्डीफाट्यापर्यंत नेली तेथे पोलिसांच्या दोन्ही वाहनांनी जीपला घेरले. वाहनचालक जाकीर हुसेन मोहम्मद पठाण (४१,रा. आंध्र प्रदेश), राजू अशोक देसले (४३,रा. अयोध्यानगरी, हिरावाडी), माजीद अब्दुल लतीफ शेख (४२, रा. गोसावीवाडी, ना.रोड) यांना ताब्यात घेतले. जीपची झाडाझडती पोलिसांनी घेतली असता प्रथमदर्शनी काहीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र अधिक बारकाईने जेव्हा कर्मचाऱ्यांनी जीपचे सीट उलथावून बघितले असता अमली पदार्थांचा वास आला. त्यामुळे सीटखाली तपासणी केली असता रबरी मॅटिनच्या थराखाली पत्र्याच्या सहाय्याने तयार केलेल्या एका ८ इंच खोलीच्या खोक्यातून सुमारे ८६ किलो ८७८ रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला. पोलिसांनी गांजाच्या साठ्यासह पाच लाख रुपये किमतीची जीप, दोन हजार ६०० रुपये रोख असा एकूण १३ लाख ७१ हजार ३८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहायक निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंतरराज्यीय तस्करीगांजासारख्या अमली पदार्थाची आंतरराज्यीय तस्करीचे रॅकेट पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरट्या पद्धतीने जीपच्या आतील बाजूने विशेष जागा करून गांजा दडवून शहरात आणला जात असल्याचे या कारवाईतून उघड झाले. पोलिसांनी पुन्हा बॉर्डरसिलिंग पॉइंटला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आंध्र प्रदेशमधून गांजा शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली तिघांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस आता त्या दिशेने धागेदोरे तपासत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी