शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी होणार सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 00:41 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या मूल्यांकनाचे धोरण स्पष्ट करतानाच अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेऊन त्याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ठळक मुद्दे९९ हजार विद्यार्थ्यांची कसोटी : शहरात ६०, ग्रामीणमध्ये २५० काॅलेज

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या मूल्यांकनाचे धोरण स्पष्ट करतानाच अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेऊन त्याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अकरावीच्या ७७ हजार ५० जागांसाठी सीईटी परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, दहावीच्या परीक्षेला मुकलेल्या जवळपास ९९ हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून कसोटी लागणार आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर अखेर राज्य शासनाने  दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पद्धत निश्चित केली आहे.  त्याचप्रमाणे अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी  सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील ६० उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील २५ हजार २७० जागांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २५० कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५१ हजार ८०० जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नाशिक जिल्ह्यातील २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावीत ५२ हजार ८०३ मुले,  तर ४६ हजार १४६ हजार मुली असे एकूण ९८ हजार ९४९  विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे दहावीची परीक्षाच रद्द झाल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाटी सीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी दहावीचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेतलेले आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे त्यांना अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण