सीईटी परीक्षा ११ मे रोजी

By Admin | Updated: April 16, 2017 01:24 IST2017-04-16T01:24:26+5:302017-04-16T01:24:26+5:30

सीईटी परीक्षा ११ मे रोजी

CET Exam May 11 | सीईटी परीक्षा ११ मे रोजी

सीईटी परीक्षा ११ मे रोजी

नाशिक : अभियांत्रिकी व फार्मसी शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामूहिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षा येत्या ११ मे रोजी नाशिकमध्ये घेण्यात येणार असून, या परीक्षेसाठी जिल्ह्यातील २० हजार ९७२ विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेसाठी नाशिक शहरात ५० केंद्रे ठेवण्यात आली आहेत. परीक्षा पार पाडण्यासाठी तेराशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सकाळी अकरा ते दुपारी साडेचार या कालावधीत तीन विषयांची परीक्षा घेण्यात येणार
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CET Exam May 11