सातपूरला रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

By Admin | Updated: May 19, 2014 00:34 IST2014-05-18T20:34:56+5:302014-05-19T00:34:37+5:30

सातपूर : सातपूर जलतरण तलाव आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Certificates distributed to donors in Satpur | सातपूरला रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

सातपूरला रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

सातपूर : सातपूर जलतरण तलाव आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सातपूर जलतरण तलाव येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन व्यवस्थापक व्ही. व्ही. चंद्रात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील देशपांडे, जनकल्याण रक्तपेढीचे संपर्कप्रमुख रामहरी संभेराव, क्रांती न्याहारकर, शंकर पाटील, संजय पाटील आदि उपस्थित होते. जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. मिलिंद राठी यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण कुलकर्णी, पांडुरंग पाटील, प्रदीप देशमुख, आशिष रोडे आदिंनी शिबिरार्थींची रक्तदान प्रक्रिया पार पाडली. रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गणेश देव्हाड, कैलास अडसरे, संदीप चव्हाण, उमेश सोनी, अरुण पवार, अंबादास तिदमे, के. के. गांगुर्डे, संदीप बर्वे, दत्ता देशमुख आदिंसह रक्तदाते उपस्थित होते.

Web Title: Certificates distributed to donors in Satpur