जबाबदारी झटकण्यावरून सीईओंना धरले धारेवर

By Admin | Updated: July 5, 2017 23:48 IST2017-07-05T23:47:46+5:302017-07-05T23:48:11+5:30

सदस्यांचा संताप : वागणूक बदलण्याची मागणी

The CEO took charge from the responsibility to shake off Dharevar | जबाबदारी झटकण्यावरून सीईओंना धरले धारेवर

जबाबदारी झटकण्यावरून सीईओंना धरले धारेवर

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी बोलण्याची पद्धत, त्यांना देण्यात येणारी अवमानजनक वागणूक, या कारणांवरून बुधवारी (दि. ५) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सर्वपक्षीय सदस्यांनी धारेवर धरले. नाही मान सन्मान तर किमान चहा-पाणी तरी विचारले तर चालेल, कामकाज करण्याची पद्धत सुधारा अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा निर्वाणीचा इशाराही बैठकीत देण्यात आला.
येवल्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवरून संजय बनकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी कोणी इच्छुक असेल, तर नावे सांगा, आपण बदली करतो, असे दीपककुमार मीना यांनी सांगताच सदस्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. खातेप्रमुखांचे प्रमुख म्हणून तुम्हाला असे बोलणे शोभत नाही. जबाबदारी झटकू नका, असे डॉ. भारती पवार व नीलेश केदार यांनी मीना यांना सुनावले. त्याचवेळी बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आपण गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे दीपककुमार मीना यांनी सांगितले. तुम्हाला भेटायचीही सदस्यांना परवानगी घ्यावी लागते, असा आरोप डॉ. भारती पवार व हिरामण खोसकर यांनी केला. तर सदस्यांना तुम्ही महत्त्व देत नाही, त्यांचा अवमान करता,असा आरोप बाळासाहेब क्षीरसागर यांनी केला. तर डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी सदस्यांमध्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये अंतर वाढल्याची खंत व्यक्त केली. नीलेश केदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कामकाजाची पद्धत सुधारण्याची सूचना केली. सदस्य आल्यावर त्यांना चहा सोडा, साधे पाणी विचारण्याचेही सौजन्य दीपककुमार मीना दाखवित नसल्याचे सांगत सिन्नरला रिक्त पदांचा प्रश्न दोन दिवसात सुटला नाही तर ‘आप का और मेरा झंझट होगा’ असा इशारा दिला.पेपर में दुनियाभरकी खबरेखातेप्रमुखांकडून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती मागविता, त्यावरच बैठकींचा निरोप देता, हे खरे आहे काय? याबाबत वृत्तपत्रात बातम्याही आल्या आहेत, याकडे डॉ. भारती पवार यांनी दीपककुमार मीना यांचे लक्ष वेधले. त्यावेळी ‘पेपर में दुनियाभरकी न्यूज आती है’ मीना यांनी सांगताच सभागृह अवाक् झाले. यामुळे सदस्यांना सन्मानाची वागणूक द्या, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दीपककुमार मीना यांना दिले.

Web Title: The CEO took charge from the responsibility to shake off Dharevar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.