‘भंगार’ विक्रीतून मध्य रेल्वेची ‘चांदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:15 IST2021-02-10T04:15:28+5:302021-02-10T04:15:28+5:30

झिरो स्क्रॅप मिशन मोहिमेमुळे केवळ भारतीय रेल्वेसाठी कमाई होत नाही तर त्याचा परिणाम अतिरिक्त जागेची उपलब्धतादेखील होते. वर्ष २०१९-२० ...

Central Railway's 'silver' from 'scrap' sale | ‘भंगार’ विक्रीतून मध्य रेल्वेची ‘चांदी’

‘भंगार’ विक्रीतून मध्य रेल्वेची ‘चांदी’

झिरो स्क्रॅप मिशन मोहिमेमुळे केवळ भारतीय रेल्वेसाठी कमाई होत नाही तर त्याचा परिणाम अतिरिक्त जागेची उपलब्धतादेखील होते. वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने ५६०५७.१५ टन वजनाच्या निरुपयोगी रुळ, रुळांचे साहित्य आदी भंगार साहित्य विकले. त्याच्या विक्रीतून ३२१.४६ कोटी महसूल जमा केला होता. कोविड साथीच्या दरम्यान देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या व पार्सल गाड्यांच्या इंजिनांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे सुटेभाग व इतर लागणाऱ्या वस्तूंची उपलब्धता निश्चित करण्यात सामग्री व्यवस्थापन विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पीपीई किट्स, एन-९५ मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स इत्यादी वस्तू कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अल्पकालावधीत निविदा काढून खरेदी करण्यात आली आहे.

Web Title: Central Railway's 'silver' from 'scrap' sale