केंद्रीय लोक निर्माणच्या कर्मचाऱ्यांची धरणे
By Admin | Updated: February 25, 2017 23:29 IST2017-02-25T23:28:48+5:302017-02-25T23:29:03+5:30
केंद्रीय लोक निर्माणच्या कर्मचाऱ्यांची धरणे

केंद्रीय लोक निर्माणच्या कर्मचाऱ्यांची धरणे
नाशिक : केंद्रीय लोक निर्माण विभाग नाशिकच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने गांधीनगर येथील कार्यालय खासगीकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. भारत सरकारकडून नियुक्त केलेल्या सचिव समूहाने १६०
वर्षांपासून कार्यरत असलेले केंद्रीय लोक निर्माण विभागाचे खासगीकरण करण्याचे सुचविले असून, त्यांच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून रोष व्यक्त केला जात आहे. याच धरतीवर संपूर्ण भारतात स्थित व नाशिक स्थित कार्यालयात प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करीत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकारी अभियंता, बाबुलाल मीना, सहायक अभियंता एस. आर. महाले, कार्यालय अधीक्षक के. एस. एम. नायर, कनिष्ठ अभियंता पंकज शर्मा, पी. जी. भनारे, टी. बी. शिंदे, एस. बी. मोरे, एस. आर. बाहेकर, आर. बी. बत्तीसे, विजय वडजे, विलास पाचरावत, श्रीमती मोनिका सिक्वेरा, मारुती दराडे, अमर नवले, दिनेशकुमार, नीलेश धराडे, राजेंद्र कोरे, राजू पगारे, देवीदास सूर्यवंशी, विलास मोरे, कविता पवार, बेबी नेहरे, कुलकर्णी, एम. टी. जाधव, शिंदे, भालेराव, मोरे आदि कर्मचारी सहभागी झाले होते.
.