शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:04 IST

दिल्लीत शिष्टमंडळ भेटले : अनुदान देण्याची मागणी

ठळक मुद्देआमदार अनिल कदम आणि आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव व चांदवड बाजार समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली.

लासलगांव : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने कांदा उत्पादकांना एक हजार रुपये प्रती क्विंटल अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी या मागणीसह नाशिक जिल्ह्यातील कांदाप्रश्नी आमदार अनिल कदम आणि आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव व चांदवड बाजार समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली.सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये रब्बी (उन्हाळ) कांद्याबरोबर खरीप (लाल) कांद्याची विक्र ी होत असून उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. जुलै महिन्यात लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा कमीत कमी ४०० रु पये तर जास्तीत जास्त १५५२ रु पये आणि सर्वसाधारण ११५१ रु पये प्रति क्विंटलने विकला गेला. मात्र, आता सदरचा उन्हाळ कांदा कमीत कमी २०१ रु पये, जास्तीत जास्त ६९० रु पये आणि सर्वसाधारण ३७० रु पये प्रति क्विंटलने विकला जात आहे. कांद्यास मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला असून केंद्र सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी यासाठी निफाडचे आमदार अनिल कदम, देवळा-चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, चांदवड पंचायत समितीचे सभापती नितीन गांगुर्डे, चांदवड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.१३) नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन महाराष्टÑात कांदा बाजारभाव घसरणीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत अवगत करून दिले.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा