शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

नाशकात केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:53 IST

दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असून, सरकार या प्रश्नी नाकर्त्यांच्या भूमिकेत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान केले.

ठळक मुद्देराष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेस: इंधन दरवाढची निषेधइंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दरवाढ तात्काळ कमी करावी

नाशिक : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असून, सरकार या प्रश्नी नाकर्त्यांच्या भूमिकेत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान केले. यावेळी प्रतिकात्मक पिंड तयार करून ते रस्त्यावर मांडत मोदी सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला व पिंडाचे पुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आंदोलनाने रस्त्याने जाणाºया येणाºयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कर्नाटक निवडणूक संपताच रोखण्यात आलेली इंधन दरवाढ पुन्हा सुरू झाली असून, १४ दिवसात पेट्रोल ३.४९ पैसेतर डिझेल ३.३६ पैसे दराने महागले आहे. इंधनाची दरवाढ गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठी दरवाढ असून, सरकारला महागाई कमी करण्याचा विसर पडला आहे. सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून, कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. महाराष्टÑाला लागून असलेल्या गुजरातमध्ये ८ ते १० रूपयांनी स्वस्त इंधन मिळते आहे. त्यामुळे सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दरवाढ तात्काळ कमी करावी अशी मागणी केली आहे. आंदोलनात नंदन भास्करे, आकाश कदम, सागर कुंदे, श्रेयांश सराफ, अतुल डुंबरे, कैलास कळमकर, संदेश टिळे, बापू गागरे, कपिल पवार, सौरभ पवार, प्रशांत बच्छाव, तेजस अहे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक