चांदवड आबड, लोढा, जैन , सुराणामहाविद्यालयास केंद्र सरकारकडून ५० लाखाचे अनुदान जाहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 17:09 IST2018-12-27T17:09:08+5:302018-12-27T17:09:48+5:30
चांदवड - चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम आबड लोढा,जैन ,सुराणा महाविद्यालयाला केंद्र सरकारने डीएसटी- फिस्ट योजनेतंर्गत ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यामुळे महाविद्यालयाची ओळख राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पातळीवर मानांकित महाविद्यालय म्हणून झाली आहे.

चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित आबड, लोढा, जैन, सुराणा, महविद्यालयाला डीएसटी फिस्ट जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. जी.एच. जैन यांचा सत्कार करतांना अध्यक्ष बेबीलाल संचेती, जवाहरलाल आबड, कांतीलाल बाफना, बाळासाहेब संचेती, अरविंद भन्साळी, डॉ. सुनील बागरेचा, सुनील चोपडा, वर्धमान लुंकड, पी.पी.गाळणकर, डॉ. तुषार चांदवडकर, डॉ. अरविंद पाटील, डॉ.राकेश संचेती , डॉ. मनोज पाटील आदि दिसत आहेत.
चांदवड आबड, लोढा, जैन , सुराणामहाविद्यालयास केंद्र सरकारकडून ५० लाखाचे अनुदान जाहीर !
चांदवड - चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम आबड लोढा,जैन ,सुराणा महाविद्यालयाला केंद्र सरकारने डीएसटी- फिस्ट योजनेतंर्गत ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यामुळे महाविद्यालयाची ओळख राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पातळीवर मानांकित महाविद्यालय म्हणून झाली आहे. उच्च शिक्षणात आधुनिक संशोधनासाठी पदव्युत्तर स्तरावरील संस्थांना पायाभूत सुविधा द्याव्यात क यासाठी आर्थिकनिधी द्यावा, या हेतुने केंद्र सरकारने ( एफ.आय.एस.टी) फंड फार इम्प्रुमेंट आॅफ सायन्स अॅड टेक्नोलॉजी ही योजना २००० -२००१ मध्ये अस्तिवात आणली. कोणत्याही पदव्यत्तुर महाविद्यालयाला पाच वर्षे किंवा कोणत्याही विद्यापीठात किंवा शैक्षणिक संस्थेच्या विभाग, केंद्र , शैक्षणिक संस्थेला सहाय्य मुलभुत उपकरणे, नेटवंकिग आणि संगणकीय सुविधा यासाठी आर्थिक निधी देते. संस्थेच्या आबड ,लोढा, जैन, सुराणा, महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाने यासाठी प्रस्ताव पाठविला होता. प्राचार्य डॉ.जी.एच.जैन यांच्या कल्पक धोरणातुन तयार झालेल्या प्रस्तावावर डॉ. गणेश पाटील , डॉ. मनोज पाटील, डॉ. अरविंद पाटील,डॉ.तुषार साळवे, डॉ. राकेश संचेती , प्रा.चैतन्य कुंभार्डे या विज्ञान विभागाच्या प्राध्यापंकानी मेहनत घेतली.केरळला सादरीकरणासाठी बोलावले. केरळला भारतातुन निवडक महविद्यालयांना सादरीकरणासाठी बोलावले होते. यातही अंतीमत:भारतातील निवडक महविद्यालयांना हा निधी दिला गेला. महाविद्यालयाला या योजनेतुन ५० लाख रुपये अनुदान मिळाले. यामुळे डीएसटी- फिस्ट महाविद्यालय ही प्रतिष्ठेची ओळख व आंतरराष्टÑीयस्तरावर होण्याचा प्रतिष्ठेचा मान महाविद्यालयाला मिळाला आहे. महाविद्यालयाच्या व संस्थेच्या इतिहासातील अत्यंत गौरवाचा क्षण आहे. या यशाबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष संपतलाल सुराणा, मानदसचिव जवाहरलाल आबड,प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजितकुमार सुराणा, महाविद्यालयाचे समन्वयक कांतीलाल बाफना, महावीरचंद पारख यांनी प्राचार्य डॉ. जी.एच.जैन,व सर्व प्राध्यापकांचे स्वागत केले.