केंद्राचा नागरी बॅँकांसाठी कर-कपातीचा निर्णय घातक : महेश आव्हाड
By Admin | Updated: March 6, 2015 00:20 IST2015-03-06T00:17:48+5:302015-03-06T00:20:12+5:30
केंद्राचा नागरी बॅँकांसाठी कर-कपातीचा निर्णय घातक : महेश आव्हाड

केंद्राचा नागरी बॅँकांसाठी कर-कपातीचा निर्णय घातक : महेश आव्हाड
नाशिक : कर्जदारांच्या ठेवींवर १० हजारापेक्षा जास्त व्याज देण्यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १० ते २० टक्के कर कपात करण्याचा निर्णय हा नागरी बॅँकांना डबघाईत टाकणारा असल्याचा आरोप नागरी सहकारी बॅँक असोसिएशनचे संचालक व नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅँकेचे ज्येष्ठ संचालक महेश आव्हाड यांनी केला आहे. सभासदांनी बॅँकेत ठेवलेल्या ठेवींवर (एफ.डी.) ठेवीदारांना १० हजारापेक्षा अधिक व्याज दिले जाणार असेल, तर ठेवीदारांना १० ते २० टक्के कर कपात केली जाणार असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. या आदेशामुळे ठेवीदार व नागी बॅँक संचालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे. या निर्णयामुळे संचालक मंडळ कितीही चांगले असले, तरी बॅँका व पतसंस्था डबघाईस येतील, असे महेश आव्हाड यांचे म्हणणे आहे. हा निर्णय बॅँका व पतसंस्थांसाठी अत्यंत घातक असून, यामुळे अच्छे दिन तर नाहीच पण सहकार क्षेत्र टिकेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी महेश आव्हाड यांनी केली आहे.(प्रतिनिधी)