खर्डे-मुलूकवाडीत पाण्यासह स्मशानभूमीची शोकांतिका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:05 IST2019-06-24T18:04:22+5:302019-06-24T18:05:28+5:30
खर्डे : देवळा तालुक्याच्या पश्चिमेकडील अतिदुर्गम अशा खर्डे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मुलूकवाडी गावात पाणी, स्मशानभूमी यासह विविध नागरी सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या समस्या तत्काळ मार्गी लावून दिलासा द्यावा ,अशी मागणी करण्यात आली आहे .

खर्डे-मुलूकवाडीत पाण्यासह स्मशानभूमीची शोकांतिका !
खर्डे व मुलूकवाडी मिळून ५ हजार ३०० लोकसंख्या असलेल्या या गावात प्रामुख्याने स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणावर गैरसोय असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . येथील मुलूकवाडी -निवाणे बारी रस्त्याला लागून असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना बसायला जागा नसून अग्नी डाग दिल्यानंतर प्रेताग्नीभोवती पाणी देताना फिरायला देखील याठिकाणी जागा नाही . अशी भयावह परिस्थिती या स्मशानभूमीची झाली आहे . समस्येच्या फेऱ्यात अडकलेल्या स्मशानभूमीत बैठक शेड व्यवस्था नसल्याने तसेच अपूर्ण अवस्थेतील थडग्यावर अंत्यविधीचा सोपस्कार पार पाडतांना नागरिकांचे प्रचंड फार हाल होतात. खूद्द पंचायत समिती सभापती केशरबाई अहिरे यांच्या मुलूकवाडी गावातील स्मशानभूमीची अशी बिकट अवस्था असेल तर परिसरातील गावांचे प्रन कसे मार्गी लागतील असे प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सदर गंभीर समस्या तत्काळ मार्गी लावावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे . डोंगर पायथ्याशी तसेच पाझर तलावाच्या लगत असलेल्या या गावात पाण्याची समस्या आ वासून उभी आहे .मुलूकवाडी गावाला ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो . त्या विहिरींची दुरावस्था झाली असून तिची दुरु स्ती आणि खोली वाढविण्यात यावी अशी मागणी होत असून ,याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे .