दफनभूमीतून ‘ते’ अर्भक ताब्यात
By Admin | Updated: May 5, 2017 00:13 IST2017-05-05T00:13:34+5:302017-05-05T00:13:53+5:30
दफनभूमीतून ‘ते’ अर्भक ताब्यात

दफनभूमीतून ‘ते’ अर्भक ताब्यात
नाशिक : शासकीय रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी पोलिसांनी अमरधामनजीकच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले ‘ते’ मृत अर्भक डीएनए चाचणीसाठी ताब्यात घेतले. गर्भपातप्रकरणी पोलिसांनी डॉ. वर्षा लहाडे यांना अटक केली आहे. सीमा शेजवळ नामक महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करून मृत अर्भक लहाडे यांनी सीमाच्या पतीकडे सोपविल्याचे तक्रारीत नमूद आहे. सीमा शेजवळ हिच्या पतीने रातोरात नाशिक अमरधामनजीकच्या स्मशानभूमीत अर्भक दफन केले होते. त्याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी दुपारी पोलीस व नाशिक तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांना घेऊन स्मशानभूमीत गेले. शेजवळ याने रात्रीच्या वेळी अर्भक दफन केल्यामुळे ती जागा शोधण्यात बराच कालावधी गेला, त्यानंतर मात्र अंदाजे खोदल्यानंतर अर्भक सापडले. पांढऱ्या रंगाच्या ओढणीत ते गुंडालेले तसेच त्यावर नावाची चिठ्ठी असल्याने ते ओळखण्यात आले. त्या मृत अर्भकाची डीएनए चाचणी करून ते सीमा शेजवळ या महिलेचे असल्याचे तसेच त्याचे वयोमान निश्चितीसाठी ही चाचणी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.