भाजपा कार्यालयात आनंदोत्सव साजरा
By Admin | Updated: October 29, 2014 23:47 IST2014-10-29T00:24:46+5:302014-10-29T23:47:56+5:30
भाजपा कार्यालयात आनंदोत्सव साजरा

भाजपा कार्यालयात आनंदोत्सव साजरा
नाशिक : राज्यात सरकार स्थापण्यासाठी भाजपाची झालेली दमदार वाटचाल व आज विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे समजताच शहरातील भाजपा कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला़
सायंकाळी सहा वाजता सरकार स्थापनेचा दावा भाजपाच्या वतीने राज्यपालांना करतानाच विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करून तेच मुख्यमंत्रिपदी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाच्या कार्यालयासह शहरात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत, फटाके फोडत आनंद साजरा केला़ पक्षाच्या एऩ डी़ पटेल रोडवरील वसंतस्मृती कार्यालयात फटाके फोडण्याबरोबरच एकमेकांना पेढे भरवले, तसेच फटाक्यांमुळे झालेला कचरा स्वच्छ करत आनंद साजरा केला़ याप्रसंगी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुनील आडके, सुरेश पाटील, अरुण शेंदुर्णीकर, सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, बापू सिनकर, गिरीश पालवे, अजिंक्य साने, अमित घुगे, सचिन हांडगे, श्याम पिंपरकर, प्रकाश दीक्षित, मोहिनी भगरे, विक्रम नागरे, दिनेश मोडक, अमोल पाटील, प्रशांत जाधव, मिलिंद आहिरराव, गोविंद कहार, श्रेयस फडणीस आदि उपस्थित होते़