वैष्णव गुजराथी समाजाचा उत्सव उत्साहात

By Admin | Updated: June 8, 2017 00:49 IST2017-06-08T00:49:33+5:302017-06-08T00:49:50+5:30

वैष्णव गुजराथी समाजाचा उत्सव उत्साहात

Celebration of Vaishnav Gujarathi Samaj | वैष्णव गुजराथी समाजाचा उत्सव उत्साहात

वैष्णव गुजराथी समाजाचा उत्सव उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येथील श्री द.सा. श्रीमाळी वैष्णव गुजराथी समाजाचे महालक्क्ष्मी मंदिरात दरवर्षी प्रमाणे वार्षिक उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यांत आला. त्या निमित्त सकाळी काकड आरती नंतर महालक्क्ष्मी मातेच्या मुर्तीचा अभिषेक पुजन करून शहरातुन पालखीची सवाद्य मिवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी सडा रांगोळी करु न मिरवणुकीचे स्वागत करण्यांत येत होते.
मिरवणुकी नंतर मंदिरात महालक्क्ष्मी मातेच्या मुर्तीस षोडशोपचार पुजा व महाआरती करण्यांत आली. आरती नंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन बसंतीबेन गुजराथी व शरयु चंद्रशेखर गुजराथी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शालेयउपयोगी वस्तु भेट स्वरु पात देण्यांत आल्या. नाशिक येथील सौ. मानसी मयूर गुजराथी यांनी एमबीबीएस परिक्षेत उत्कृष्ट गुणांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही समाजाचे वतीने गौरव करण्यांत आला. कार्यक्र माचे सुत्रसंचलन महिला मंडळाच्या सुमित्रा गुजराथी यांनी केले तर आभार समाजाचे अध्यक्ष सुरेशभाई गुजराथी यांनी मानले. यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या विनोदी व्याख्यानाने कार्यक्र मात रंग भरला. महाप्रसादाने कार्यक्र माचा समारोप करण्यात आला. समाजातील स्व. बच्चूभाई रंगनाथ गुजराथी यांच्या परिवाराचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यांत आले होते. कार्यक्र मास येवला, कोपरगांव, मनमाड, नाशिक, पुणे, सिन्नर, ठाणे, कर्जत, मुंबई येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Celebration of Vaishnav Gujarathi Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.