कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांसमवेत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 10:55 PM2019-07-27T22:55:52+5:302019-07-27T23:07:42+5:30

सुरगाणा : देशाची सेवा करायला मिळणे हे मोठे भाग्याचे असून तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील आदिवासी तरुणांना सैन्य भरतीसाठी प्रयत्न करता येतील असे प्रतिपादन तालुक्यातील सतखांब येथील माजी सैनिक जयवंत गावित यांनी येथे हतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या गुणगौरव कार्यक्र मात केले.

Celebration with Ex-Servicemen on Kargil Victory Day | कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांसमवेत सत्कार

Kargil Victory Day

Next
ठळक मुद्देहुतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिवसाचे आयोजन

सुरगाणा : देशाची सेवा करायला मिळणे हे मोठे भाग्याचे असून तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील आदिवासी तरुणांना सैन्य भरतीसाठी प्रयत्न करता येतील असे प्रतिपादन तालुक्यातील सतखांब येथील माजी सैनिक जयवंत गावित यांनी येथे हतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या गुणगौरव कार्यक्र मात केले.
येथील भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या वतीने येथील पोलिस ठाण्यासमोरील हुतात्मा स्मारकाजवळ कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयवंत गावित बोलत होते. याप्रसंगी सुरगाणा येथे कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून आम्हा माजी सैनिकांचा असा सत्कार प्रथमच केला जात असल्याते म्हणाले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांना कारगिल विजय चषक, फेटा व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर हुतात्मा स्मारकाजवळ माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहिद वीर पत्नी अनुसया भोये, शांताराम जाधव, पांडुरंग महाले, बळवंत गावित, भागवत जाधव, काशिनाथ गायकवाड, शिवराम चौधरी पिंपळसोंड उंबरपाडा आदि माजी सैनिकांना गौरविण्यात आले. विजयी दिनानिमित्त फटाके फोडून भारत माता कि जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्र मास एन.डी.गावित, माजी नगराध्यक्ष रंजना लहरे, नगरसेवक डॉ.विनोद महाले, ज्ञानेश्वर कराटे, लक्ष्मण जाधव, होनाजी भोये, विशाल सोनवणे, भाऊसाहेब दवंडे, शाम पवार, दिनकर पिंगळे, रतन चौधरी, काशिनाथ भोये, नामदेव पवार, नरेश दळवी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी विजय कानडे, रमेश थोरात आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Celebration with Ex-Servicemen on Kargil Victory Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.