येवला येथील महालक्ष्मी मंदिरात वार्षिक उत्सव साजरा

By Admin | Updated: June 2, 2015 00:15 IST2015-06-01T22:43:50+5:302015-06-02T00:15:54+5:30

येवला येथील महालक्ष्मी मंदिरात वार्षिक उत्सव साजरा

Celebration of annual festival at Mahalaxmi temple in Yeola | येवला येथील महालक्ष्मी मंदिरात वार्षिक उत्सव साजरा

येवला येथील महालक्ष्मी मंदिरात वार्षिक उत्सव साजरा

येवला : येथील मेनरोडवरील महालक्ष्मी मंदिरात वार्षिक उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सकाळी काकड आरतीनंतर शहरातून सवाद्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
मिरवणुकीनंतर मंदिरात महालक्ष्मी मातेच्या मूर्तीला अभिषेक व पूजा आरती करण्यात आली. यानंतर कोपरगाव येथील डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र कौन्सिल आॅफ होमिओपॅथीतर्फे डॉ. हॅनेमान जीवन गौरव पुरस्कार मिळाला तसेच पाटोदा येथील मयूरी भगवान पाटोदकर हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पोलीस निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल व दीपक पाटोदकर यांची महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा संरक्षण परिषद समितीवर निवड झाली व दुर्गेश सुनील पाटोदकर यांची महाराष्ट्रीयन मारवाडी गुजराथी मंचच्या येवला तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या सर्वांचे समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला. महिला मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन दिलीप गुजराथी व मृगया गुजराथी यांनी केले. सुरेशभाई गुजराथी यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)

Web Title: Celebration of annual festival at Mahalaxmi temple in Yeola