संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:51 IST2020-02-13T23:26:29+5:302020-02-14T00:51:26+5:30

संत रोहिदास बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र चर्मकार संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाडा कॉलनीत संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

Celebration on the anniversary of Saint Rohidas Maharaj | संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक

म्हाडा कॉलनीत आयोजित संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त पालखी मिरवणुकीत सहभागी महिला.

सातपूर : संत रोहिदास बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र चर्मकार संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाडा कॉलनीत संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
म्हाडा कॉलनीतील संत रोहिदास महाराज मंदिरात आयोजित जयंती उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मधुकर जाधव, माजी नगरसेवक नंदू जाधव, महाराष्ट्र चर्मकार संघर्ष संघटनेचे संस्थापक महेंद्र अ हिरे, शीतल विसावे, धर्माजी गोविंद, यशवंत पवार आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्तविक संत रोहिदास बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष संतोष माने यांनी केले. स्वागत जयंती उत्सव अध्यक्ष सूर्यभान वेताळ यांनी केले. उपाध्यक्ष बबन वाघ यांनी आभार मानले. यावेळी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संजय गुंजाळ, बाळासाहेब पोटे, रवी चव्हाण, रमेश साबळे, अनिल वेताळ, टी. एन. गायकवाड आदींसह संस्थेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Celebration on the anniversary of Saint Rohidas Maharaj