काबरा माध्यमिक विद्यालयात जागतिक विज्ञान दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 04:14 PM2020-03-01T16:14:42+5:302020-03-01T16:14:57+5:30

मालेगाव : कै. ल. रा. काबरा माध्यमिक विद्यालयात आज जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश बागड होते. प्रास्ताविक दीपक वाघ यांनी केले.

Celebrating World Science Day at Kabra Secondary School | काबरा माध्यमिक विद्यालयात जागतिक विज्ञान दिन साजरा

काबरा माध्यमिक विद्यालयात जागतिक विज्ञान दिन साजरा

googlenewsNext

मालेगाव : कै. ल. रा. काबरा माध्यमिक विद्यालयात आज जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश बागड होते. प्रास्ताविक दीपक वाघ यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी गायत्री सोनवणे, धृती गोस्वामी, रेणुका साळुंखे, दिक्षा अहिरे, नेहा पवार आदि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशांत बेले या विद्यार्थ्याने विज्ञानाचा चमत्कार या कहाणीद्वारे विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षक सरोज देवरे, निनाद म्हसदे यांनी मनोगत व्यक्त केले. विज्ञान शिक्षक किशोर जाधव यांनी अंधश्रद्धेचा त्याग करत विज्ञानाची कास धरण्याचा आग्रह धरला. मुख्याध्यापक नितीन हिरे, महेश बागड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी गीतांजली निकम हिने केले. आभार दीपक वाघ यांनी मानले.

Web Title: Celebrating World Science Day at Kabra Secondary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.