वणी येथे विजयादशमी साजरी
By Admin | Updated: October 6, 2014 00:13 IST2014-10-05T00:53:34+5:302014-10-06T00:13:30+5:30
वणी येथे विजयादशमी साजरी

वणी येथे विजयादशमी साजरी
वणी : येथे पारंपरिक पद्धतीने विजयादशमी साजरी करण्यात आली. जगदंबा देवी मंदिरात प्रात:पूजा साहेबराव थोरात यांनी सपत्नीक करून घटविर्सजन केले. त्यानंतर मध्यान्ह आरती करण्यात आली.
देवीचा मुखवटा सुशोभित पालखीत ठेवून वाद्यमिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचे पालखीचे मानकरी असलेल्या सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या मिरवणुकीत गावातील थोरात, देशमुख परिवाराचे सदस्य सहभागी झाले होते. भाजी बाजारात ही पालखी आल्यानंतर शिंपी समाज व मुस्लीम समाजाला सन्मानाने पालखीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले. पालखी पूजनानंतर वणी उपबाजार समिती आवारात आपट्यांच्या पानांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी पुन्हा मुख्य रस्त्याहून देवीमंदिरात आली. १८७३ पासून सुरू झालेल्या या परंपरेला गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व स्तरातील मान्यवर व नागरिक उपस्थित असतात. यावेळी संस्थानच्या उपाध्यक्ष सरस्वती थोरात व मनोज थोरात, गणेश देशमुख, मीनाक्षी देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.