नवजीवन वर्ल्डपिस फाउंडेशनची सिन्नर वर्षा रन स्पर्धा उत्साहात

By Admin | Updated: August 21, 2014 00:15 IST2014-08-20T22:54:02+5:302014-08-21T00:15:43+5:30

नवजीवन वर्ल्डपिस फाउंडेशनची सिन्नर वर्षा रन स्पर्धा उत्साहात

Celebrating the Sinnar Rain Run Contest of Navjivan Worldpiece Foundation | नवजीवन वर्ल्डपिस फाउंडेशनची सिन्नर वर्षा रन स्पर्धा उत्साहात

नवजीवन वर्ल्डपिस फाउंडेशनची सिन्नर वर्षा रन स्पर्धा उत्साहात

सिन्नर : येथील नवजीवन वर्ल्डपिस फाउंडेशनच्या वतीने आयोजित वर्षा रन - २०१४ स्पर्धा येथील नवजीवन डे स्कूलच्या मैदानात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत भूषण मुरकुटे प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरला.
प्रारंभी सकाळी आठला फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष देशमुख व विजया देशमुख यांच्या हस्ते वर्षा रनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, माजी उपनगराध्यक्ष लताताई मुंढे, पंचायत समितीचे सदस्य उदय सांगळे, नायब तहसीलदार दत्ता वायचळे, एस. बी. देशमुख, अरुण जाधव, बाळासाहेब शेळके, विजय काळे, सोननाथ चांदोरे, बी. बी. पाटील आदि उपस्थित होते.
या स्पर्धेत नवजीवन डे स्कूलच्या एक हजार विद्यार्थी, २०० पालक व ४० मान्यवरांची सहभाग घेतला. डुबेरे नाका येथून प्रारंभ झाल्यावर सिन्नर बसस्थानक, गावठा, नवापूल, गणेश पेठ, शिवाजी चौक, वावीवेस, तहसील कार्यालय, टपाल कार्यालय, लाल चौक, नाशिक वेस, भैरवनाथ मंदिर मार्गे पुन्हा नवजीवन डे स्कूलमध्ये दाखल झाले.
सिन्नरमध्ये प्रथमच झालेल्या
या स्पर्धेत पहिले बक्षीस सायकल देऊन मुरकुटे याचा गौरव करण्यात आला. समरोप कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी बक्षिसे दिली.
यावेळी नगरसेवक बापू गोजरे, हर्षद देशमुख, सुभाष देशमुख, अनिल
काळे, मुकुंद पंडित, संजय आनेराव, नाना भगत, शाहुराज कुंभार,
समाधान गायकवाड यांच्या हस्ते सोडत काढून बक्षिसांचे वितरण करण्यात आले. एस. बी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक महेंद्र विंचुरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र वाघ, प्रल्हाद देशमुख, राहुल सूर्यवंशी, शरद शिंदे आदिंसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Celebrating the Sinnar Rain Run Contest of Navjivan Worldpiece Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.