काव्य मंचाचा अकरावा वर्धापनदिन साजरा
By Admin | Updated: September 10, 2014 01:08 IST2014-09-09T23:22:02+5:302014-09-10T01:08:16+5:30
काव्य मंचाचा अकरावा वर्धापनदिन साजरा

काव्य मंचाचा अकरावा वर्धापनदिन साजरा
नाशिक : काव्य मंच संस्थेचा अकरावा वर्धापनदिन कुसुमाग्रज स्मारकातील श्रावण हॉलमध्ये रविवारी साजरा झाला़ अध्यक्षस्थानी डॉ़ श्रीकांत पूर्णपात्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नरेश महाजन उपस्थित होते़ यावेळी अरुण सोनवणे, सुशीला संकलेचा, मनोहर उपासनी, विजय वऱ्हाडे, डॉ़ सुधीर करमरकर यांसह सुमारे पंधरा ते वीस कवींनी आपल्या कविता उपस्थितांसमोर सादर केल्या़ गीतांजली एरंडे यांनी सादर केलेल्या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला, तर प्रशांत जहागीरदार यांच्या ‘बघू जरा’ या कवितेने उपस्थितांची विशेष दाद मिळविली़ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेश महाजन यांनी कविता या विषयावर मार्गदर्शन करून स्वत:च्या तीन कविता यावेळी सादर केल्या़ संस्थेच्या वर्धापनदिनाला कवी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)