रंगांशिवाय साजरी केली रंगपंचमी

By Admin | Updated: March 30, 2016 23:54 IST2016-03-30T23:43:32+5:302016-03-30T23:54:05+5:30

जैन सोशल ग्रुपचा आगळावेगळा उपक्रम

Celebrated without color, colorful | रंगांशिवाय साजरी केली रंगपंचमी

रंगांशिवाय साजरी केली रंगपंचमी

नाशिक : कोणत्याही प्रकारचे रंग न वापरता जैन सोशल ग्रुप नाशिकतर्फे अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. हल्दी लॉन्स येथे रंगपंचमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ग्रुपचे सर्व सदस्य आपल्या परिवारासह उपस्थित झाले होते. पंजाबी थीमवर आयोजित या कार्यक्र मामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यात डेकोरेशन करण्यात आले होते. पंजाबी ढाब्याप्रमाणे सर्वांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई येथून खास पंजाबी कलाकारांना बोलविण्यात आले होते. त्यांनी विविध प्रकारांत पंजाबी नृत्ये सादर केली. तसेच विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्र मात कोणत्याही प्रकारच्या रंगांचा वापर करण्यात आला नाही. ग्रुपचे अध्यक्ष विजय लोहाडे मागील तीन वर्षांपासून बिगर पाण्याची रंगपंचमी आयोजित करीत होते. परंतु यावर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक गावांमध्ये १५ ते २० दिवस नळाला पाणी येत नाही. त्यामुळेच आम्ही यावर्षी विनारंगांची रंगपंचमी साजरी करण्याचे ठरविले, असे सांगितले. सेक्रे टरी संदीप कटारिया यांनी सांगितले की, ग्रुपचे ८०० सदस्य आहे. त्यामुळे आज बिगर रंगांची रंगपंचमी झाल्याने लाखो लिटर पाण्याची बचत झाली आहे. कार्यक्र माच्या शेवटी खेळातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. बेस्ट मेल ड्रेस म्हणून संदीप पहाडे, बेस्ट फीमेल ड्रेस शिखा लोहाडे, बेस्ट कपल नयन व स्विटी झांजरी यांना विजेता घोषित करण्यात आले.

Web Title: Celebrated without color, colorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.