त्र्यंबकला महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा

By Admin | Updated: May 5, 2014 19:18 IST2014-05-05T17:38:59+5:302014-05-05T19:18:37+5:30

त्र्यंबकेश्वर - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५४ वा वर्धापनदिन येथील त्र्यंबक पंचायत समिती (सकाळी ७.१० वा.), तर शासकीय मुख्य सोहळा त्र्यंबक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा केला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग (उपविभागीय कार्यालय १ अणि २) त्र्यंबक ग्रामीण रुग्णालय, त्र्यंबक नगरपालिका, म.वि.प्र. समाजाचे सिनियर महाविद्यालय आदि ठिकाणी संपन्न झाला.

Celebrated by Trimbakkala Maharashtra | त्र्यंबकला महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा

त्र्यंबकला महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा

त्र्यंबकेश्वर - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५४ वा वर्धापनदिन येथील त्र्यंबक पंचायत समिती (सकाळी ७.१० वा.), तर शासकीय मुख्य सोहळा त्र्यंबक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा केला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग (उपविभागीय कार्यालय १ अणि २) त्र्यंबक ग्रामीण रुग्णालय, त्र्यंबक नगरपालिका, म.वि.प्र. समाजाचे सिनियर महाविद्यालय आदि ठिकाणी संपन्न झाला.

त्र्यंबक पंचायत समिती
येथील त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयात सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सभापती पंचायत समिती श्रीमती सुनंदाताई भोये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसभापती शांताराम मुळाणे, गट विकास अधिकारी प्रमिला ज्वरवलेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी वाघ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. व्ही. जोशी, उपअभियंता वनमाने, गट शिक्षण अधिकारी माळवाळ, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र शिरसाट, शिक्षक-शिक्षिका कार्यालयीन कर्मचारी आदि उपस्थित होते.


त्र्यंबक तहसीलदार कार्यालय
येथे मुख्य शासकीय त्र्यंबक कार्यालयाच्या प्रांगणात सर्व शासकीय कार्यालयाचे प्रमुखांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ध्वजारोहण त्र्यंबक तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. तहसीलदारांनी झोकदार असा गुलाबी फेटा परिधान केला होता. सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यादवराव तुंगार, पो.नि. शांताराम वळवी, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, कृषी अधिकारी अजय फलके, निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, बाळासाहेब शेवाळे, सौ. बहिरम, दिनेश पाटील, कारभारी वाघ, धनंजय तुंगार, संतोष कदम, योगेश तुंगार, भगवान
नायब तहसीलदार कांबळे, नगराध्यक्ष यशोदा अडसरे, सुनील अठसरे, अनघा फडके आदि मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात डॉ. अशोक माने यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी डॉ. भागवत लोंढे, डॉ. विठ्ठलराव काळे व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Web Title: Celebrated by Trimbakkala Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.