मखमलाबाद येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

By Admin | Updated: May 16, 2014 00:24 IST2014-05-15T23:10:31+5:302014-05-16T00:24:59+5:30

पंचवटी : संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मखमलाबाद येथील सिद्धार्थनगरमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले.

Celebrated Buddha Purnima at Makhmalabad | मखमलाबाद येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

मखमलाबाद येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

पंचवटी : संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मखमलाबाद येथील सिद्धार्थनगरमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले.
जयंती सम्यक सम्बुद्ध शैक्षणिक संस्था यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार ॲड. उत्तमराव ढिकले, नगरसेवक दामोदर मानकर, ज्ञानेश्वर काकड, यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ढिकले यांनी गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या बुद्ध आणि धम्माविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी खीर वाटपाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष उमेश साळवे, महिंद्र साळवे, लक्ष्मी साळवे, रुपा साळवे, वनिता गवारे, जगदीश साळवे, महेश साळवे, नितीन दोंदे, सुमित गायकवाड, सुनिल खाने, आकाश साळवे आदिंसह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Celebrated Buddha Purnima at Makhmalabad