मसगा महाविद्यालयात युवा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:12+5:302021-08-13T04:18:12+5:30
अध्यक्षस्थानी म.स.गा. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दिनेश शिरुडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश ॲड. ए. के. ...

मसगा महाविद्यालयात युवा दिन साजरा
अध्यक्षस्थानी म.स.गा. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दिनेश शिरुडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश ॲड. ए. के. देशमुख, सहदिवाणी न्यायाधीश एस. आर. निमसे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब पाटील, वकील संघाचे सचिव ॲड. एन. एस. पाटील आदी उपस्थित होते. सामाजिक उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल दिव्या देशमुख, निकीता देशमुख, मोहिते कडनोर, अश्विनी माळी, भाग्येश जाधव, महेश वेताळ, विलास देवरे, राहुल मोरे, कामेश गायकवाड, दीपक वाघ, ॠतिक कट्यारे, आकाश भामरे, अजय बंद्रे या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक व स्वागत विशाखा समितीच्या अध्यक्षा प्रा. योगिता पवार यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य सी. एम. निकम, उपप्राचार्य दीपक सूर्यवंशी, कुलसचिव रघुनाथ शेलार, प्रा. रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. आभार एस. बी. अहिरे यांनी मानले.