पॉलिजेंटामध्ये राष्टÑीय सुरक्षा सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 06:32 PM2019-03-09T18:32:29+5:302019-03-09T18:33:18+5:30

अवनखेड येथील पॉलिजेंटा टेक्नॉलॉजिस लिमिटेड या कंपनीत राष्टÑीय सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तसेच ८ मार्च रोजी महिलादिनीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Celebrate the National Safety Week in Polygenta | पॉलिजेंटामध्ये राष्टÑीय सुरक्षा सप्ताह साजरा

राष्टÑीय सुरक्षा सप्ताहानिमित्त शपथ घेताना पॉलिजेंटा टेक्नॉलॉजिसमधील कर्मचारी व अधिकारी.

Next

दिंडोरी : अवनखेड येथील पॉलिजेंटा टेक्नॉलॉजिस लिमिटेड या कंपनीत राष्टÑीय सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तसेच ८ मार्च रोजी महिलादिनीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कंपनीत ४ मार्चपासून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह विशेष उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त कामगारांना सुरक्षिततेचे महत्त्व व आवश्यकता याचे प्रबोधन अधिकारीवर्गाकडून करण्यात आले. सेफ्टी क्विझ, भित्तिचित्र, घोषवाक्य स्पर्धा, रक्तदान शिबिर, दंत व नेत्र तपासणी असे सुरक्षिततेला अनुकूल विविध उपक्र म राबविण्यात आले. कामगार व व्यवस्थापन कर्मचारी यात सहभागी झाले होते. याशिवाय, महिला दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. धनवंत येवला, मकरंद कुलकर्णी, सुचिता अकोलकर, पल्लवी गरु ड व भावनकुमार सोनी यांनी या कार्यक्र माचे संयोजन केले होते.

 

Web Title: Celebrate the National Safety Week in Polygenta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.