मालेगावी रमजान ईद उत्साहात साजरी

By Admin | Updated: July 7, 2016 22:19 IST2016-07-07T22:19:16+5:302016-07-07T22:19:40+5:30

मालेगावी रमजान ईद उत्साहात साजरी

Celebrate the Malegaon Ramzan Id | मालेगावी रमजान ईद उत्साहात साजरी

मालेगावी रमजान ईद उत्साहात साजरी

आझादनगर : मालेगाव शहरातील मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद (ईद- उल- फित्र) निमित्ताने पोलीस कवायत मैदानावरील मुख्य ईदगाहसह एकूण दहा ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. मुख्य ईदगाह येथे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी तर देवीचा मळा येथील अहमद रजा
ईदगाह याठिकाणी मौलाना हाफीज गुफरान कादरी यांनी नमाजाचे नेतृत्व केले. ईद निमित्ताने इदगाह परिसरात चोख पोलीस
बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गुरूवारी सकाळी मुख्य ईदगाह मैदानावर सकाळी सुमारे सव्वा नऊ वाजता ईदच्या नमाजास प्रारंभ झाला.
शहरातील उर्वरित ईदगाह येथे नऊ ते साडेनऊ वाजेदरम्यान नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांचा राष्ट्रीय एकात्मता समिती, महसुल विभाग आणि पोलीस दलाकडून अनुक्रमे बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी, प्रांताधिकारी अजय मोरे, मनपा आयुक्त रविंद्र जगताप, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम समाजात महिन्याभराच्या उपवास (रोजा) अंती रमजान ईद साजरी करण्यात येते. या पर्वाची मुस्लिम अबालवृद्ध मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे ईदच्या नमाज पठणासाठी शहरातील सर्वच रस्त्यांवर मुस्लीम बांधवांची गर्दी झाली होती. नमाजनंतर मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस प्रशासनाकडून शहरात सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. दोन राज्यराखीव दल, एक जलद कृती पथक, ३२ पोलीस अधिकारी, सातशे पोलीस कर्मचारी व चार बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या साह्याने अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

Web Title: Celebrate the Malegaon Ramzan Id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.