नाग मंदिरात दर्शनासाठी रीघ...
By Admin | Updated: August 2, 2014 01:24 IST2014-08-02T00:24:46+5:302014-08-02T01:24:50+5:30
नाग मंदिरात दर्शनासाठी रीघ...

नाग मंदिरात दर्शनासाठी रीघ...
पंचवटी : शेकडो वर्षांची परंपरा असलेली मखमलाबाद येथील नागपंचमीची भरविण्यात आलेली यात्रा उत्साहात पार पडली. ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी निवृत्ती मानकर, पुंडलीक खोडे, त्र्यंबक तांदळे, नारायण काकड, नगरसेवक सिंधू खोडे, अनिल काकड, प्रमोद पालवे यांच्या उपस्थितीत नागदेवता मंदिरात सकाळी ध्वजारोहण व पूजन करण्यात आले. त्यानंतर यात्रेला प्रारंभ झाला. तवली फाट्यावरील नागदेवतेला नवस केल्यास तो पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सकाळी गावातील महिलांनी नवसपूर्तीसाठी गर्दी केली होती. यात्रोत्सवानिमित्ताने परिसरात खेळण्यांची तसेच खाऊची दुकाने थाटलेली होती. शेकडो भाविकांनी तवली डोंगरावर असलेल्या नागदेवतेच्या मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. नागपंचमीच्या दिवशी तवली फाट्यावरील नागदेवता मंदिरात यात्रा भरत असल्याने शेकडो भाविक श्रद्धेने याठिकाणी हजेरी लावत असतात. यात्रोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही कुस्त्यांची दंगल भरविण्यात आली होती. या कुस्तीच्या दंगलीत शहर तसेच ग्रामीण भागातील मल्ल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)