एचएएल हायस्कूलमध्ये अंत्योदय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:49+5:302021-09-26T04:16:49+5:30
प्रारंभी प्राचार्य के. एन. पाटील , उपप्राचार्य चौधरी , पर्यवेक्षक देवरे, शेवाळे यांच्या हस्ते ...

एचएएल हायस्कूलमध्ये अंत्योदय दिवस साजरा
प्रारंभी प्राचार्य के. एन. पाटील , उपप्राचार्य चौधरी , पर्यवेक्षक देवरे, शेवाळे यांच्या हस्ते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य पाटील यांनी, पं. दीनदयाल यांची राष्ट्र सेवा आणि देशातील शेवटच्या गरीब व मागास व्यक्तीचा विकास व्हावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातूनच भारत सरकारने सुरू केलेल्या अंत्योदय योजनेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमधून नमित धनावडे या पाचवीच्या विद्यार्थ्याने माहिती सादर केली. तसेच श्रीमती कोबरने यांनी पं. दीनदयाल यांचे कार्य विशद केले. प्रास्तविक व सूत्रसंचालन डी. के. हातखंबकर यांनी केले. हरिष चन्द्रे यांनी आभार मानले.
फोटोसाठी - प्रतिमापूजन करताना प्राचार्य के. एन. पाटील, उपप्राचार्य चौधरी, पर्यवेक्षक शेवाळे, देवरे आदी शिक्षकवृंद.