साईनाथ मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात
By Admin | Updated: April 26, 2015 23:20 IST2015-04-26T23:20:19+5:302015-04-26T23:20:47+5:30
साईनाथ मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात

साईनाथ मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात
सिडको : जुने सिडकोतील श्री साईनाथ मंदिराच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त दोनदिवसीय उत्सवात विविध कार्यक्रम झाले. महोत्सवाचा शुभारंभ साई पालखी मिरवणुकीने झाला. साईभक्त मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
शिवाजी चौकातील श्री साईनाथ मंदिराच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त साईपालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत उंट, घोडे, मालेगाव ढोल, नाशिकचा गुलाब खान हाजी यांचा बडे ढोल, सनईवादक, महाराजा ब्रास बँड हे सिडकोवासीयांसाठी प्रमुख आकर्षण ठरले. कलशधारी महिला, वारकरी भजनी मंडळ पालखीच्या मागे होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मुख्य चौकांमध्ये फुगड्या, नृत्यही केले. शिवाजी चौकातून ही पालखी मिरवणूक महात्मा फुले चौक, हरेश्वर चौक, राणाप्रताप चौक, वीर सावरकर चौक, तुळजाभवानी चौक या मार्गाने काढण्यात आली. या मिरवणुकीत बंटी तिदमे, विक्रम काळे, किरण भांबेरे, बाळासाहेब सोनजे, शब्बीर मुल्ला, शरद फडोळ, दौलत भांबेरे, पद्माकर काळे, देवीदास देवकर, भास्कर घडवजे, संदीप पांडे, त्र्यंबक बडदे, सुनील निकुंभ, आण्णा देवरे, हेमंत कोठारी आदिंसह महिला आणि नागरिक सहभागी झाले होते.