सीसीटीव्हीमुळे सराईत गुन्हेगार इराणी झाला जेरबंद

By Admin | Updated: January 25, 2016 23:24 IST2016-01-25T23:21:25+5:302016-01-25T23:24:10+5:30

सीसीटीव्हीमुळे सराईत गुन्हेगार इराणी झाला जेरबंद

CCTV has earned the mercenary of Irani, | सीसीटीव्हीमुळे सराईत गुन्हेगार इराणी झाला जेरबंद

सीसीटीव्हीमुळे सराईत गुन्हेगार इराणी झाला जेरबंद

इंदिरानगर : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांसह महिलांची लूट, तसेच चेनस्रॅचिंग करणारा श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगार करम नूर अली इराणी यास इंदिरानगर पोलिसांनी सुमारे तीन दिवसांपूर्वी अटक केली़ या तोतयाचा शोध घेण्यास पोलिसांसाठी सर्वांत महत्त्वाचा दुवा ठरले ते इंदिरानगरमध्ये युनिक ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे़ या कॅमेऱ्यांमुळेच या तोतया पोलिसास पकडण्यात यश आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ तसेच यातील उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले़
सुमारे चार महिन्यांपूर्वी इंदिरानगर परिसरातील अशोका स्कूल, भगवती चौक, महाराष्ट्र बँक व बापू बंगला परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून चार वृद्ध नागरिकांची लूट करण्यात आली होती़ त्यामध्ये सोन्याची चेन व अंगठ्यांचा समावेश होता़ या घटनेमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती़ संशयित करम नूर अली इराणी हा भगवती चौकात ज्येष्ठ नागरिकाची लूट करीत असल्याचे युनिक ग्रुपने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले़
या सीसीटीव्ही फुटेजवरून इंदिरानगर पोलीस इराणी व त्याच्या तिघा साथीदारांचा शोध घेत होते़ दरम्यान, पाच दिवसांपूर्वी श्रीरामपूरला सापळा रचून इराणी यास अटक करण्यात आली असून, त्याने शहर परिसरातील आठ गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे़ तसेच त्याने लुटीचे सोने विकलेल्या सराफाकडून २५ तोळे सोनेही जप्त करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: CCTV has earned the mercenary of Irani,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.