शासकीय धान्य गुदामावर सीसीटीव्हीची नजर
By Admin | Updated: February 9, 2016 22:38 IST2016-02-09T22:37:33+5:302016-02-09T22:38:44+5:30
शासकीय धान्य गुदामावर सीसीटीव्हीची नजर

शासकीय धान्य गुदामावर सीसीटीव्हीची नजर
पेठ : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या सुरगाणा शासकीय धान्य घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने तालुक्यातील शासकीय धान्य गुदामात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा घेतलेला निर्णय पेठ तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला असून,यामुळे आता गुदामातील प्रत्येक हालचालीवर तहसीलदारांची करडी नजर असणार आहे़
पेठ तालुक्यात एकूण १३२ स्वस्त धान्य दुकाने असून, जवळपास अंत्योदय योजनेंतर्गत दहा हजार ५२४ तर अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सात हजार ९११ शिधापत्रिका आहेत़ यामध्ये दरमहा ३३७८ क्विंटल गहू व २२५२ क्ंिवटल तांदूळ, २६८ क्विंटल साखर, वाटप करण्यात येत असते़ यावर नियंत्रण रहावे व गुदामातील हालचालींवर लक्ष रहावे यासाठी चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ (वार्ताहर)