शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

शिवभोजन ग्राहकांच्या छायाचित्रावर सीसीटीव्हीचा चेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 23:48 IST

नाशिक : राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर जिल्ह्यातील ८९ पैकी ७८ केंद्र संचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे आता लाभार्थ्यांची नोंद घेताना सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. यामुळे थाळी वाटपात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देपुरवठा विभाग : जिल्ह्यातील ७८ केंद्रांनी घेतली दक्षता

नाशिक : राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर जिल्ह्यातील ८९ पैकी ७८ केंद्र संचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे आता लाभार्थ्यांची नोंद घेताना सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. यामुळे थाळी वाटपात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात ८९ ठिकाणी शिवभोजन केंद्रे देण्यात आली आहेत. विशेषत: बाजार समित्या, बसस्थानके, रेल्वेस्थानक तसेच जेथे जिल्हाभरातून येणाऱ्या लोकांची रेलचेल आहे अशा ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अवघ्या दहा रुपयांत भोजन मिळत असून, हजारो गरजूंना या थाळीचा लाभ होत आहे. त्यामुळे केंद्रांवर पारदर्शकता असावी, यासाठी राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांना आदेशित करून सीसीटीव्ही सक्तीचे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शिवभोजन केंद्र संचालकांना सीसीटीव्ही लावण्याबाबत सांगण्यात आले होते.जिल्ह्यातील ८९ पैकी ७८ शिवभोजन थाळी केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात आले असून, ११ केंद्रे अनेकविध कारणांमुळे सध्या बंद आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली. राज्य शासनाच्या आदेशानुसार ३१ जानेवरीपर्यंत केंद्रांनी सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु केंद्र संचालकांनी जिल्हा प्रशासनाकडे मुदत वाढवून मागितली होती. राज्य शासनालादेखील त्यांनी याबाबत कळविले होते. त्यानुसार केंद्रांना सवलत देण्यात आली होती. मार्चमध्ये या केंद्रांचा आढावा घेतला असता, जिल्ह्यातील ८९ पैकी ७८ शिवभोजन थाळी केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात आले अससल्याचे दिसून आले.पुरवठा विभागाचे आदेशशिवभोजन थाळी वाटपात केंद्रचालकांकडून खोट्या नोंदी करून लाखो रुपये लाटले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केल्याने राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने काढले होते. लाभार्थ्यांचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरले जात असल्याचा आरोप झाल्याने सीसीटीव्हीचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी