मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण
By Admin | Updated: May 27, 2014 14:50 IST2014-05-27T14:50:02+5:302014-05-27T14:50:02+5:30
मागील भांडणाची कुरापत काढून एकास दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली आहे़

मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून एकास दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, वसंत काशीनाथ गावित (रा़ गंगापूर गाव, बसस्टॉपजवळ) हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगापूर बसस्टॉपवर उभे होते़ यावेळी संशयित पोपट मोहिते व विनायक मोहिते (दोघेही राहणार गंगापूर गाव) हे तिथे आले़ त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून गावित यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली़ यामध्ये गावित त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅ क्चर होऊन ते जखमी झाले़ या प्रकरणी गावित यांनी दिलेल्या फि र्यादीवरून पोपट व विनायक मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)