शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे ,कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
4
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
5
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
6
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
7
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
8
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
9
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
10
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
11
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
12
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
13
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
14
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
15
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
16
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
18
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
19
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
20
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

विहिरीत बिबट्यासह बछड्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 3:39 PM

सिन्नर : तालुक्यातील शहा येथे बिबट्यासह बछडा विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला. शहा येथील सुरेश सैंदर यांच्या विहिरीत दोन ते तीन दिवसांपासून बिबट्या व बछड्या विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे मोहदरीला वनविभागाच्या उद्यानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिन्नर : तालुक्यातील शहा येथे बिबट्यासह बछडा विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला. शहा येथील सुरेश सैंदर यांच्या विहिरीत दोन ते तीन दिवसांपासून बिबट्या व बछड्या विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.शहा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य जाणवत होते. काही शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या. दिवसभर शांत बसणारा बिबट्या रात्रीच्या वेळी अन्नपाण्याच्या शोधात बाहेर पडायचा. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने बिबट्या व बछडा सैंदर यांच्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.ग्रामस्थांनी बिबट्या व बछडा मृतावस्थेत पाहिल्यानंतर वनविभागाशी संपर्क केला. सिन्नर परिक्षेत्र अधिकारी टी. बी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. ए. सरोदे, के. आर. इरकर, वनसेवक जगन जाधव, तुकाराम मेंगाळ, नारायण वैद्य, रोहित लोणारे, वनपाल ए. बी. साळवे, टी. ए. भुजबळ आदी कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचून बिबट्या व बछडा यांना बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एच. अलकुटे यांनी त्यांचे शवविच्छेदन केले.फोटो क्र.- 30२्रल्लस्रँ02फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील शहा येथे विहिरीत तरंगत असलेला बिबट्या व बछड्याचा मृतदेह.