विहिरीत बिबट्यासह बछड्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 15:39 IST2019-04-30T15:39:51+5:302019-04-30T15:39:58+5:30
सिन्नर : तालुक्यातील शहा येथे बिबट्यासह बछडा विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला. शहा येथील सुरेश सैंदर यांच्या विहिरीत दोन ते तीन दिवसांपासून बिबट्या व बछड्या विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

विहिरीत बिबट्यासह बछड्याचा मृतदेह
सिन्नर : तालुक्यातील शहा येथे बिबट्यासह बछडा विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला. शहा येथील सुरेश सैंदर यांच्या विहिरीत दोन ते तीन दिवसांपासून बिबट्या व बछड्या विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शहा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य जाणवत होते. काही शेतकऱ्यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्या होत्या. दिवसभर शांत बसणारा बिबट्या रात्रीच्या वेळी अन्नपाण्याच्या शोधात बाहेर पडायचा. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने बिबट्या व बछडा सैंदर यांच्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
ग्रामस्थांनी बिबट्या व बछडा मृतावस्थेत पाहिल्यानंतर वनविभागाशी संपर्क केला. सिन्नर परिक्षेत्र अधिकारी टी. बी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. ए. सरोदे, के. आर. इरकर, वनसेवक जगन जाधव, तुकाराम मेंगाळ, नारायण वैद्य, रोहित लोणारे, वनपाल ए. बी. साळवे, टी. ए. भुजबळ आदी कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचून बिबट्या व बछडा यांना बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एच. अलकुटे यांनी त्यांचे शवविच्छेदन केले.
फोटो क्र.- 30२्रल्लस्रँ02
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील शहा येथे विहिरीत तरंगत असलेला बिबट्या व बछड्याचा मृतदेह.