‘कॅट्स’ची तुकडी देशसेवेसाठी सज्ज : युद्धभूमीचा थरार
By Admin | Updated: May 13, 2017 22:33 IST2017-05-13T22:33:14+5:302017-05-13T22:33:14+5:30
भारतीय सैन्य दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची २७वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज

‘कॅट्स’ची तुकडी देशसेवेसाठी सज्ज : युद्धभूमीचा थरार
नाशिक : भारतीय सैन्य दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची २७वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा २७ दीक्षांत सोहळा शनिवारी (दि.१३) लष्करी थाटात पार पडला.
गांधीनगर एअरफिल्ड येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. २७व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊन, या तुकडीमधून २८ वैमानिक देशसेवेसाठी विविध ठिकाणी रुजू होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलविणे आदि बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. या प्रशिक्षणार्थी जवानांचा दीक्षांत सोहळा शनिवारी पार पडला.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण के लेल्या २८ वैमानिकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘प्रमाणपत्र’ लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारिया विशिष्ट सेवा मेडल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले सलारिया यांनी यावेळी लढाऊ वैमानिकांच्या तुकडीला मार्गदर्शन करताना सांगितले.