आॅनलाईन फसवणुकीद्वारे शहरात पाऊण लाखाचा गंडा

By Admin | Updated: April 27, 2017 17:47 IST2017-04-27T17:47:49+5:302017-04-27T17:47:49+5:30

आॅनलाईन फसवणुकीद्वारे शहरात पाऊण लाखाचा गंडा

Catching money in the city through online fraud | आॅनलाईन फसवणुकीद्वारे शहरात पाऊण लाखाचा गंडा

आॅनलाईन फसवणुकीद्वारे शहरात पाऊण लाखाचा गंडा

नाशिक- तुमच्या एटीएमचा पिन नंबर द्या, एटिएम कार्डावरील सीव्ही नंबर द्या, मोबाईलवर पाठविलेला ओटीपी नंबर द्या, एटिएमवरील १३ आकडी नंबर सांगा यासह अन्य कारणे सांगून परराज्यातील काही संशयीतांनी नागरिकांना पाऊण लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.
शहरातील विविध खातेदारांच्या खात्यांतुन परस्पर लाखो रुपयांची रोख रक्कम वळती करुन घेत फसवणुक होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
म्हसरुळ येथील प्रभातनगरमध्ये असलेल्या वसंत बिहारमध्ये रहाणाऱ्या जयंत लिलके यांना ६ ते २४ एप्रिल दरम्यान संशयीत राकेश भारद्वाज याने फोन करुन, गोड गोड बोलुन लोन मंजूर झाल्याचे सांगत त्यांच्या खात्यातुन ३२ हजार रुपये ट्रान्स्सफर करवुन घेत त्यांची फसवणूक केली. अंबड परिसरात रहाणाऱ्या ४० वर्षीय इसमाकडून बॅँक खात्याची माहिती करुन घेत ४० हजार रुपयांची फसवणुक केली. अंबड येथील महालक्ष्मीनगरमध्ये असलेल्या संचित रो-हाऊसमधील जर्नादन सोनवणे यांच्या एटिएम कार्डवरील माहिती मिळवत नंदन पासवान, शंकरदास, जगदिश नासकर या संशयितांनी परस्पर ४० हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.

Web Title: Catching money in the city through online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.