शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मांजरपाड्याच्या पाण्याने दुष्काळ हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:17 IST

येवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.

ठळक मुद्देगतवर्षी पेक्षा जास्त पाणी मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे.पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम १९७२ ला सुरू झाले. ४० ते ४५ वर्षांनंतर २०१९ ला पूर्ण झाले. पहिल्याच प्रयत्नात पुणेगाव ते दरसवाडी ६३ किमी आणि दरसवाडी ते बाळापूर ४२ किमी अशी १०५ किमी कालवा चाचणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांच्या तिसºया पिढीला पाणी पाहण्याचा योग आला. पाणी आले अन सतत दुष्काळी असा शिक्का असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी दसºयालाच दिवाळी साजरी केली.मांजरपाडा प्रकल्पाचे काम अपूर्ण असूनही बाळापूर पर्यंत पाणी आले होते. जून२०२० अखेर पर्यंत मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाणी डोंगरगाव पर्यंत जाईल असे नियोजित असताना दुर्दैवाने कोरोना संकटाने लॉकडाऊन सुरू झाला प्रकल्पाचे काम बंद पडले.मांजरपाडा काम अपुर्ण असले तरी मागील वर्षा प्रमाणे निश्चितच पाणी येवला तालुक्यात पोहचेल असा विश्वास होता. मात्र मांजरपाडा, पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी या लाभ क्षेत्रात कमी पाऊस असल्याने पाणी येणार की नाही या चिंतेत शेतकरी होता. मात्र गेल्या ५दिवसापासून या लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्याने धरणे चांगली भरली आहेत. त्यामुळे कालवा पुन्हा वाहणार अशी आशा निर्माण झाली आहे.लॉकडाऊन शिथिल होताच पुणेगाव ते बाळापूर पर्यंत कालवा दुरु स्ती, विस्तारीकरण, अडथळा दगड काढणे आदी कामे सुरू करण्यात आली होती. पुणेगाव ते दरसवाडी हे काम पूर्ण झाले असून दरसवाडी ते बाळापूर मधील काम अंतिम टप्प्यात आहे. विसापूर ते बाळापूर हे शेवटचे काम सुरू आहे. कालवा दुरु स्ती, रु ंदीकरण झाल्याने दरसवाडी येथून पाणी सुटल्यावर तीन दिवसात पाणी पोहचेल अशी अपेक्षा आहे.पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते बाळापूर कालवा दुरु स्ती झाली आहे. निसर्गकृपेने पाच-सहा दिवसापासून मांजरपाडा बोगदा चांगल्या क्षमतेने वाहतो आहे, पुणेगाव ५० टक्के भरले आहे. सुदैवाने पावसाने दरसवाडी ६० टक्के भरले आहे. मागील वर्षीप्रमाण यंदा निश्चितच पाणी येणार यात शंका नाही.- मोहन शेलार, आंदोलक

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी