मारहाण करून रोकड लंपास
By Admin | Updated: January 7, 2016 22:51 IST2016-01-07T22:47:10+5:302016-01-07T22:51:38+5:30
मारहाण करून रोकड लंपास

मारहाण करून रोकड लंपास
नाशिकरोड : मारुती आॅटोमोटिव्ह कंपनीचा कर्मचारी डीजीपीनगर गणपती मंदिरासमोरून मोटारसायकलवर जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना गाडी आडवी मारून दांडुक्याने डोक्यात प्रहार करून जखमी करत ५३ हजारांची रोकड चोरून
नेली.
अंबड येथील मारुती आॅटोमोटिव्ह कंपनीचे कर्मचारी किरण विजय भालेराव, रा. लोखंडे मळा, जेलरोड हे मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपनगर सिंधी कॉलनी येथे कंपनीचे ५३ हजार ५१० रुपये घेण्यासाठी आले होते. भालेराव सदर रक्कम घेऊन मोटार सायकलवरून पुन्हा कंपनीत डीजीपीनगर मार्गे मोटारसायकलवरून जात होते. यावेळी श्री गणेश मंदिरासमोर पाठीमागून हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी भालेराव यांच्या गाडीला अडविले व लाकडी दांडुक्याने भालेराव यांच्या डोक्यात प्रहार करून जखमी केले.प्रतिनिधी)