शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:31 IST

बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पंचवटीतील अभंगनगरमध्ये घडली आहे़

नाशिक : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पंचवटीतील अभंगनगरमध्ये घडली आहे़  भालचंद्र अपार्टमेंटमधील रहिवासी नरेंद्र देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार (दि़२१) ते शनिवार (दि़२४) या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ घरातील ३३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके व अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ) व २० हजार रुपयांची रोख रक्कम असा ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़व्यवसायाकरिता पैसे आणत  नसल्याने विवाहितेचा छळपतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या वडिलांच्या दुचाकीची तोडफोड केल्याची फिर्याद पीडित विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़  कल्पना विलास पाथरे (३४, रा़ तक्षशिला विद्यालयासमोर, देवळालीगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून पती दीपक पाथरे, संजय पाथरे (जेठ), जयश्री पाथरे, दिलीप पाथरे (दीर), अनिता आहेर (नणंद), मधुकर आहेर (नंदोई) व भाचा हेमंत तेली (सर्व राहणार गोरेवाडी, मारुती मंदिराजवळ, जेलरोड) यांनी ५ मे २०११ ते २४ नोव्हेंबर २०११ या कालावधित वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला़ तसेच पती दीपक पाथरे याने विवाहितेच्या वडिलांच्या दुचाकीची (एमएच १५, डीएफ ३८९२) तोडफोड केली. तसेच घराच्या काचा फोडून मोठे नुकसान केले़याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विवाहिता छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दारू पिण्यासाठी उद्यानाचे दरवाजा न उघडल्याने मारहाणदारू पिण्यासाठी उद्यानाचे गेट न उघडल्याने तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकरोड मुक्तिधामसमोरील सोमानी उद्यानात घडली आहे़ राजेंद्र पाठक (रा़ इच्छामणीनगर, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उद्यानातील खेळण्यांचा ठेकाअसलेल्या इसमाकडे ते कामास असल्यानेउद्यानाचे प्रवेशद्वार उघडणे वा बंद करण्याचे काम ते करतात़शुक्रवारी (दि़२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यानाचे गेट बंद केले़ यावेळी तिथे आलेले संशयित निखिल (रा़ भालेराव मळा), हर्षद (रा़ सुभाषरोड) व ओम यांनी दारू पिण्यासाठी उद्यानाचे गेट न उघडल्याच्या कारणावरून या तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली़ यामध्ये पाठक यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे़ या प्रकरणी तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी