मनमाड : येथील देना बॅँकेत रक्कम काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पिशवीला कापून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपयांची रोकड लांबवली. चक्क बॅँकेच्या हद्दीत सुरक्षा रक्षक असताना घडलेल्या सदर प्रकारामुळे बॅँकेची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असल्याचे उघड झाले आहे.मनमाड येथील रहिवाशी असलेली व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेली छाया अविनाश अहिरे ही महिला आज रेल्वे स्थानक परिसरातील देना बॅँकेत पैसे काढण्यासाठी आली. पन्नास हजारांची रक्कम काढून पिशवीत ठेवली. शेजारी बसलेल्या इसमाने खाली पडलेले कागदपत्र तुमचे आहे का? असे विचारले. पिशवीतील कागद खाली पडल्याचे पाहून महिलेने पिशवी तपासली असता खालून ब्लेड मारून कापलेली असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी छाया अविनाश अहिरे यांनी मनमाड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
देना बॅँकेतून रोकड लंपास
By admin | Updated: July 15, 2016 01:49 IST