काठेगल्लीतील कारमधून रोकड लंपास
By Admin | Updated: April 2, 2017 21:29 IST2017-04-02T21:29:55+5:302017-04-02T21:29:55+5:30
कारमध्ये ठेवलेली ४५ हजार रुपये असलेली रोख रकमेची बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना

काठेगल्लीतील कारमधून रोकड लंपास
नाशिक : दुकानाची उधारी वसूल करून कारमध्ये ठेवलेली ४५ हजार रुपये असलेली रोख रकमेची बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१) सकाळच्या सुमारास काठे गल्लीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजपाल क्ष्यालीराम विग (४५, रा़ कर्मा हाईट, गणेशनगर, काठेगल्ली, द्वारका) यांनी आपली इनोव्हा कार (एमएच १५, सीएम ५११३) ही सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिराजवळ उभी केलेली होती़ या कारमध्ये असलेल्या निळ्या पिवळ्या रंगाच्या हॅण्डबॅगमध्ये दुकानातील वसुलीची बिले तसेच ४५ हजार रुपयांची रोकड होती़ चोरट्यांनी या कारमधून सदर बॅग चोरून नेली़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विग यांच्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़