रिक्षा प्रवासादरम्यान रोकड लंपास
By Admin | Updated: November 1, 2015 22:04 IST2015-11-01T22:03:02+5:302015-11-01T22:04:29+5:30
रिक्षा प्रवासादरम्यान रोकड लंपास

रिक्षा प्रवासादरम्यान रोकड लंपास
नाशिक : मेळा बसस्टॅण्ड ते कॉलेजरोड दरम्यान प्रवास करीत असता रिक्षातील सहप्रवाशांनी सुटकेसमधील साठ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि़३०) घडली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर रोडवरील सौभाग्यनगरच्या अरिहंत अपार्टमेंटमध्ये राहणारे संजय छाजेड (५१) हे शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मेळा बसस्टॅण्डहून कॉलेजरोडला जाण्यासाठी रिक्षामध्ये (एमएच १५, एके ५३९१) बसले़ या प्रवासादरम्यान रिक्षामध्ये बसलेल्या संशयितांनी त्यांच्या सुटकेसमधील साठ हजार रुपयांची रोकड लंपास केली़
सुटकेसमधील रोकड लंपास झाल्याचे लक्षात येताच छाजेड यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचालक संशयित जालिंदर केळकर (३५, नाटकर गल्ली, मालविय चौक, पंचवटी) यासह चौघांना अटक केली आहे़ (प्रतिनिधी)