पंचवटीतील टीडीआर घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:13+5:302021-09-21T04:16:13+5:30

जमिनींचे घोटाळे अधिकारी आणि बिल्डर्स संगनमताने घोटाळे केले जातात आणि बदनाम मात्र नगरसेवकांना केले जाते असा आरोप करीत पाटील ...

A case will be registered in the TDR scam case in Panchavati | पंचवटीतील टीडीआर घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल होणार

पंचवटीतील टीडीआर घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल होणार

जमिनींचे घोटाळे अधिकारी आणि बिल्डर्स संगनमताने घोटाळे केले जातात आणि बदनाम मात्र नगरसेवकांना केले जाते असा आरोप करीत पाटील यांनी सर्व गैरप्रकारांना पुन्हा एकदा उघड केले. सर्व्हे नंबर १५९ (पै.) आरक्षण क्रमांक ११२वर मैदानाचे आरक्षण होते. ते ताब्यात घेताना त्यावरील बांधीव शेड आणि अतिक्रमण असतानाही हा भूखंड ताब्यात घेण्यात आला. त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम महापालिकेच्या खर्चाने हटवावे लागले. त्याची भरपाई सुद्धा महापालिकेने घेतलेली नाही. कमी क्षेत्राची खरेदी करून टीडीआर मात्र पूर्ण भूखंडावर देण्यात आला. यासंदर्भाच चाैकशी करून कारवाई करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला. मात्र, चौकशी समितीची बँक झाली नाही की, कारवाईदेखील झालेली नाही. यासंदर्भात पाटील यांनी महासभेचा अवमान झाल्या प्रकरणी हक्कभंग म्हणून प्रस्ताव मांडल्याचे नमूद केले. मात्र, त्याबाबत नगररचना विभागाचे सहसंचालक अंकुश सोनकांबळे आणि प्रशासन उपआयुक्त मनोज घोडेपाटील समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. चौकशी समितीचे अध्यक्ष संदीप नलावडे हे अपघाताच्या कारणामुळे रजेवर आहेत, मिळकत विभागाच्या एका अभियंत्याच्या ड्राव्हरमध्ये हा ठराव पडून असल्याचे जगदीश पाटील यांनी निर्दशनास आणून देताना प्रशासन आणि बिल्डर्स अत्यंत निर्ढावलेले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी गिते यांनी केली.

इन्फो....

महासभेचे हंगामी महापौर गणेश गिते यांनी या प्रकरणात प्रशासनाच्या ढिम्म पणावर ताशेरे ओढत तातडीने चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले तसेच या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि बिल्डर्सवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: A case will be registered in the TDR scam case in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.